जिल्ह्यातील शिक्षकांना समुपदेशनाने गाव देण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

मंत्री महाजन यांची अन्यायग्रस्त शिक्षकांनी घेतली भेट

 
जामनेर :
बदली प्रक्रियेत समुपदेशन किंवा प्राधान्यक्रम न विचारता शनिवारी जळगाव जिल्ह्यातून १६० शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
 
 
इतर बदल्या करतांना शासनाने विकल्प भरून घेतले होते. मात्र,शासन आदेशात नसतांना-रँडम राऊंडचा उपयोग करून बाहेरील जिल्ह्यातून येणार्‍या शिक्षकांना समुपदेशन हा अधिकार डावलण्यात आला. अतिशय गैरसोयीची गावे देण्यात आल्या. यात विधवा, अपंग, महिला असा कोणताही विचार करण्यात आला नाही. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही समुपदेशन पद्धत घेऊन जिल्हा पातळीवर आदेशित करावे. इतर जिल्ह्यात २०० किमी अंतरावरून बदली करून पुन्हा ८०-९० किमी टाकले. जिल्हा बदलीच्या आनंदावर विरजण पडले. प्रत्येकाच्या स्व-तालुक्यात जागा असूनही डावलले. ५टक्के शिक्षकही या प्रक्रियेवर समाधानी नसल्याचे अन्यायग्रस्त शिक्षकांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटी दरम्यान सांगितले. शिक्षकांना त्वरित विकल्प किंवा समुपदेशन करून आदेश दुरुस्ती करून द्यावे, अशी मागणी शिक्षकांनी केलेली आहे. जामनेर, जळगाव, पारोळा, रावेर, यावल, पाचोरा, एरंडोल येथील सर्व शिक्षक महिला अपंग शिक्षक उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@