नरेंद्र पाटील व संचालक मंडळाकडे नूतन मराठा शैक्षणिक संस्थेचा ताबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

२०१२ पासून संस्थेवर प्रशासक, २०१५ मध्ये निवडणूक घेण्यात आली.

 
 
फेब्रुवारीपासून संस्थेत होता पोलीस बंदोबस्त
जळगाव :
गेल्या चार महिन्यांपासून शहरातील नूतन मराठा शैक्षणिक संस्थेत चेअरमन नरेंद्र पाटील व त्यांच्या संचालक मंडळाला संस्थेत प्रवेश करण्यापासून मज्जाव केला होता. पोलिसांनी सीआरपीसी १४५ प्रमाणे तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे संस्थेबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यावर निर्णय होवून संस्थेचा ताबा नरेंद्र पाटील यांच्या संचालक मंडळाकडेच असल्याचा निर्णय देण्यात आला. १८ जूनपासून संस्थेचे कामकाज पूर्ववत सुरु होणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. पत्रपरिषदेला संचालक मंडळातील सदस्य, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, विनोद देशमुख उपस्थित होते.
 
 
२००३ ते २०१८ पर्यंत फेरफार अर्ज वादांकित असून प्रलंबित आहे. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला प्रस्ताव काढून टाकण्यात आला असल्याचे आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी १२ जून रोजी दिले आहेत. त्यामुळे संस्थेचे चेअरमन नरेंद्र पाटील यांच्या संचालक मंडळाचा ताबा संस्थेवर असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
असा झाला होता गोंधळ
जानेवारी २०१८ला सरकारतर्फे या संस्थेस पत्र मिळाले. त्यात संस्थेचे कामकाज धर्मदाय नियमाप्रमाणे चालले पाहिजे, असे सांगण्यात आले होते. त्यापत्रामुळे वादंग झाले. ते केवळ पत्र होते. शासनाचा आदेश नव्हता. ही संस्था सहकारी नियमांप्रमाणे चालते. संस्था कोणत्या नियमांप्रमाणे चालवायची हे संचालक ठरवतात. त्यामुळे सरकारचा यात हस्तक्षेप येत नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. संस्थेत पोलीस बंदोबस्त आम्ही मागितला नसतांना देण्यात आला. जे सभासद नाहीत त्यांनी संस्थेचा दरवाजा तोडला. पण पोलिसांनी कारवाई केली नाही. येणार्‍या काळात त्यांच्यावर तसेच बँकेत खोटी कागदपत्रे सादर करणार्‍यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
 
@@AUTHORINFO_V1@@