बिपीन रावत यांचा जम्मू-काश्मीर दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : भारतीय सैन्य प्रमुख बिपीन रावत यांनी आज जम्मू-काश्मीर येथील महत्वाच्या क्षेत्राचा दौरा केला. या दौऱ्यात बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांनी मारलेल्या औरंगजेबच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सात्वन केले. भारतीय जवान औरंगजेब याचे अपहरण करत त्याची निर्घुण हत्या दहशतवाद्यांकडून करण्यात आली होती. 
 
 
 
 
 
पुंछ येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानातील रायफलमॅन औरंगजेब याची निर्घुण हत्या केली होती. यामुळे औरंगजेबचे कुटुंब खूपच दुखी: झाले होते. त्यांचे सात्वन करण्यासाठी बिपीन रावत हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. पुलवामामधून अपहरण करण्यात आलेला जवान हा दहशतवादी समीर टायगरच्या चकमकीत सहभागी होता. औरंगजेब हा पूँछ येथे राहणारा होता. सुट्टीसाठी घरी परतत असताना त्याचे सशस्त्र दहशतवाद्यांनी अपहरण केले. त्यानंतर त्याची निघृण हत्या करण्यात आली.
 
 
 
 
रमजानच्या काळात भारतीय लष्कराने शस्त्रसंधी जाहीर केली आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या भारतविरोधी कारवायाच्या सुरूच आहे. औरंगजेबच्या हत्येच्या प्रकरणानंतर हे दिसून आले आहे. त्यामुळे याविषयी महत्वाची ठोस पावले उचलणे आता अत्यावश्यक झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@