लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |




नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याविषयी केंद्र सरकारमध्ये सुरु असलेल्या चर्चेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये आपले मत मांडत असताना, पंतप्रधानांनी या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त केली आहे, तसेच राज्यांना याविषयी पुन्हा एकदा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आयोगाच्या बैठकीच्या सुरुवातील पंतप्रधानांनी आपले भाषण केले. यामध्ये त्यांनी सरकारच्या गेल्या वर्षातील कामकाजाचा आढावा घेत, देशहितासाठी आवश्यक असलेल्या काही नव्या बदलांविषयी देखील आपले मत मांडले. ज्यामध्ये त्यांनी देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या खर्चावर देखील उपस्थितांचे लक्ष वेधले. या दोन्ही निवडणुकांवर होणारा खर्च हा फार मोठा असून लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास यामुळे देशाचा मोठ्या प्रमाणात पैसे वाचेल, असे त्यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे राज्य सरकारांनी यावर पुन्हा एकदा विचार करून दोन्ही निवडणुकांसाठी एकच मतदार तयार करण्याविषयी प्रयत्न करावेत, असे मोदींनी म्हटले.


देशामध्ये प्रत्येक वर्षी कोणत्याना कोणत्या राज्यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका पार पडत असतात, तसेच प्रत्येक राज्यात दर पाच वर्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यात येतात, या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च येतो. विशेष करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हा खर्च अधिक प्रमाणात वाढतो. परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाही. परंतु मोदी सरकारने यावर आपले मत मांडत एकत्र निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याला निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मोदींना पुन्हा एकदा हा विषय सर्वांसमोर मांडल्यामुळे पुढील वर्षी दोन्ही निवडणुका एकत्र होणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@