अमेरिकेच्या व्यापार युद्धाला भारताचे प्रत्युत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |

अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर भारत लावणार अतिरिक्त कर



नवी दिल्ली : भारतातून निर्यात होणाऱ्या अॅल्युमिनियम आणि स्टीलवर अतिरिक्त कर लावण्यासंबंधी अमेरिकेने घेतलेल्या निर्णयानंतर भारताने देखील अमेरिकेला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वस्तूंवर अमेरिकेने अतिरिक्त कर लावल्यानंतर आता भारताने देखील अमेरिकेतून येणाऱ्या तब्बल ३० वस्तूंवर अतिरिक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वाहनांसह अनेक वस्तूंचा समावेश असून येत्या २१ तारखेपासून हा नियम लागू करण्यात येणार असल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेतून येणाऱ्या मोटारसायकल, फळे, सुका मेवा यासारख्या ३० उत्पादनांवर ५० टक्के अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला असून येत्या गुरुवारपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. यानंतर अमेरिकेतून येणाऱ्या या सर्व वस्तूंवर अधिक कर आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे येत्या गुरुवारपासूनच अमेरिका देखील भारतातून निर्यात होणाऱ्या अॅल्युमिनियम आणि स्टीलवर अतिरिक्त कर आकाराने सुरु करणार आहे. तशी सूचना देखील अमेरिकेने दिलेली आहे. त्यामुळे भारताने देखील अमेरिकेचीच खेळी करत, गुरुवारपासूनच अमेरिकन वस्तूंवर अतिरिक्त कर लावणे सुरु करणार आहे. दरम्यान अमेरिकेकडून मात्र यावर अद्याप कसलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

गेल्या काही महिन्यापूर्वी चीनसंबंधी देखील अमेरिकेने अशाप्रकारचा निर्णय घेतला होता. चीनमधून आयात होणाऱ्या मालावर अमेरिकेने अतिरिक्त कर लावून चीनला व्यापारात शह देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चीनने अमेरिकेला व्यापार युद्ध न करण्याचा सल्ला दिला होता. परंतु अमेरिकेन आपला निर्णय कायम ठेवल्यानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे थोड्याच दिवसात अमेरिका ताळ्यावर आला होता. त्यानंतर अमेरिकेने भारतातून येणाऱ्या मालावर कर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताने देखील चीनप्रमाणे भूमिका घेत, अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@