कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे पंतप्रधानाचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |

नीती आयोगाची चौथी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न




नवी दिल्ली :
देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नीती आयोगा आणि सर्व राज्यांनी भर द्यावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले आहेत. नवी दिल्ली येथे पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये आज त्यांनी हे आदेश दिले आहेत. तसेच देशातील सर्व राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करण्यास सज्ज असून आवश्यक ती सर्व मदत नक्कीच केली जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

'देशाचा विकास दर दुप्पट करणे हे केंद्र सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी देशातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हे अत्यंत गरजेचे आहे. कृषी क्षेत्राच्या विकास आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्यासाठी सर्व राज्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. तसेच यासाठी एक आराखडा तयार केला पाहिजे.' असे मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मांडले. तसेच शेतकऱ्यांसंबंधित सर्व मुद्दांवर तोडगा काढण्यासाठी म्हणून एक समिती बनवण्याचे आदेश देखील पंतप्रधानांनी नीती आयोगाला दिले आहेत.
राज्यांना मिळणाऱ्या निधीमध्ये झाली वाढ
गेल्या सरकारच्या काळामध्ये केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या निधीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये सर्व राज्यांना एकूण ११ लाख कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारांच्या विकासाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वसन मोदींनी यावेळी दिले.
नव्या राज्यांना 'विशेष दर्जा' देण्याला सकारात्मक प्रतिसाद
आंध्र प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांना विशेष दर्जा देण्याच्या मागणीला पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर पंतप्रधान मोदी यांनी आपले मत मांडत याप्रश्नावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
@@AUTHORINFO_V1@@