'दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करा' : केंद्र सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |

जम्मू-काश्मीरमधील शस्त्रसंधी मागे घेण्याचा निर्णय 




श्रीनगर : रमजान महिन्यानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी अखेर मागे घेण्याचा निर्णय भारत सरकारने आज घेतला आहे. रमजान महिन्या संपल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असून पुन्हा एकदा राज्यात दहशतवादीविरोधी मोहिमा सुरु करण्याचे आदेश लष्कराला सरकारकडून देण्यात आले आहेत.



केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आजच या विषयी माहिती दिली आहे. रमजान महिना सुरु झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या मागणीनुसार भारत सरकारने राज्यात एकतर्फी युद्धबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. सैनिकांनी देखील सरकारी आदेशांचे पालन करून राज्यात युद्धबंदी लागू केली होती. परंतु दहशतवाद्यांनी मात्र या संधीचा फायदा घेत भारतीय लष्करावर हल्ले करणे सुरूच ठेवले होते. या हल्ल्यांमध्ये काही जवान जखमी झाले तर काही जण शहीद झाले. पण आता रमजान महिना संपला असून भारत सरकारने शस्त्रसंधी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दहशतवाद्यांविरोधात कठोरातकठोर भूमिका घेण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे, असे सिंग यांनी सांगितले आहे.





गेल्या मे महिन्यातील १७ तारखेला भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील स्थानिक पक्षांच्या आग्रहाखातर रमजान महिन्यामध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या नव्या निर्णयानुसार लष्करला जम्मू-काश्मीरमध्ये स्वतःहून शोधमोहीमा राबवण्याला मज्जाव घालण्यात आला होता. तसेच स्वतःहून कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु लष्करावर कोणी हल्ला केल्यास त्याचे रोखठोक उत्तर देण्याची देखील सुट सरकारने दिली होती. भारत सरकारच्या या निर्णयानंतर देखील दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला करणे सुरूच ठेवले होते. यामध्ये अनेक जवान आणि नागरिक जखमी झाले होते. तसेच काहींचा मृत्यू देखील झाला होता. परंतु नुकतीच काल रमजान ईद पार पडल्यामुळे सरकारने आता आपला निर्णय मागे घेतला आहे.


@@AUTHORINFO_V1@@