भर पावसात गाळ्यांवर रेल्वे पोलिसांची धडक कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |



 

 
४० वर्षांपूर्वीची दुकाने भुईसपाट

अंबरनाथ: रेल्वे हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या गाळ्यांवर रेल्वे पोलिसांनी आज धडक मोहीम राबवून भर पावसात गाळे जमीनदोस्त केले. अंबरनाथ पूर्व भागात रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या ११ दुकाने आणि गाळ्यांवर आज रविवारी सकाळी ११ वाजता कारवाईला सुरुवात झाली, रेल्वेच्या विशेष पथकाने, रेल्वे पोलीस आणि शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने भर पावसात कारवाई करून बांधकामे जमीनदोस्त केली. एक वाजता कारवाई संपली.

या ठिकाणी झेरॉक्स सेंटर, ड्रायफूट , मोबाईल दुरुस्ती, पानाचे तसेच हाराचे गाळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. याप्रकरणी दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही दुकानदारांनी दुकानातील सामान काढून घेतले होते. सकाळी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, शिवाजीनगर पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी असा मोठा बंदोबस्त कारवाईसाठी सज्ज राखण्यात आला होता. गाळे आणि दुकाने असलेल्या ठिकाणी रेल्वेतर्फे दवाखाना उभारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गाळे आणि बेकायदा फेरीवाले यामुळे नागरिकांना चालण्याची कसरत करावी लागत असे, सध्या नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि वाहन शिवाजी चौकात दिवसभर उभे करण्यात येते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे सोयीचे जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@