कोकण पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरेंचे पारडे जड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |



 

वाडा: कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक २५ जून रोजी होत आहे. या मतदार संघातील १ लाख ४ हजार २६४ पदवीधर मतदार मतदानात भाग घेणार आहेत. त्यांची जिल्हानिहाय मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यात (४५ हजार ८३४ )आहेत. त्या खालोखाल रायगड- १९ हजार ९१८ , पालघर-१६ हजार ९८२ , रत्नागिरी- १६ हजार २२२ , सिंधुदुर्ग- ५ ,३०८ असे मतदार आहेत. योग्यतेच्या कसोटीवर उमेदवाराची निवड करण्याचे स्वातंत्र्य पदवीधर मतदारांना आहे. ही निवडणूक इतर निवडणुकींसारखी मर्यादित मतदार संघापुरती नसते. कोंकण पदवीधर मतदार संघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. म्हणजेच या मतदार संघाचे क्षेत्रफळ अवाढव्य आहे.
 
 

भाजपचे उमेदवार अ‍ॅड. निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीचे याच मतदार संघाचे मावळते आमदार आहेत. सहा वर्षांचा अनुभव, त्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघाशी साधलेला संपर्क व या काळात त्यांनी केलेले भरीव कार्य या निरंजन डावखरे यांच्या जमेच्या बाजू आहेत. वसंतराव डावखरे यांचा सर्वपक्षीयांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध व ऋणानुबंध, त्यांची पुण्याई ही निरंजन डावखरेच्या कामी येईल. निरंजन डावखरे यांची राष्ट्रवादीत जी अवहेलना व कुचंबणा झाली त्यामुळे त्यांना नाईलाजाने पक्ष सोडणे भाग पडले. त्यामुळे जे वसंतराव डावखरेंच्या उपकारांना विसरले व त्यांच्या पुत्राची जी अवहेलना केली त्यामुळे निरंजन डावखरेंबद्दलची सहानुभूती वाढली आहे. वसंतराव डावखरेंबद्दल ऋण व्यक्त करण्याचीही भावना मतदारांत आहे. तसेच त्यांच्या विरोधात एकाही गुन्ह्याची नोंद नाही. ते याच मतदार संघातील आमदार असल्याने ते वगळता अन्य उमेदवार ठाण्याबाहेरील असून अपरिचित आहेत.

भाजपचा हा पारंपरिक मतदार संघ आहे. गेल्या वेळचा अपवाद वगळता या मतदार संघावर व शिक्षक मतदार संघावर भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघातील भाजपचे सर्व नेते, आजी-माजी आमदार व खासदार तसेच विधान परिषद सदस्यांनी एकमुखाने अ‍ॅड.निरंजन डावखरे यांना सक्रिय पाठिंबा दिला आहे. याशिवाय कोंकणातील दोन्ही जिल्ह्यांत वर्चस्व असलेल्या नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेदेखील अ‍ॅड. निरंजन डावखरेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.

@@AUTHORINFO_V1@@