आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |



 
 
मुंबई ;  आज मुंबई येथे रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रविवार असल्या कारणाने अधिक नागरिकांना याचा त्रास भोगावा लागणार नाही, मात्र रविवारी प्रवास करत असलेल्यांना विविध मार्गांचा विचार करणे भाग पडणार आहे. तांत्रिक कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परळ स्थानकाच्या नव्या फलाटासाठी मध्य रेल्वेवर आठ तासांचा, तर हार्बर मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना थोड्या फार प्रमाणात यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे.
 
 
 
 
परळ स्थानकात नव्या फलाटांसाठी रुळांच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी साडे नऊ ते साडे पास चा वेळात आठ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर व माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या नेहमीच्या थांब्यासह अन्य स्थानकांवरही थांबतील. यामुळे लोकल फेऱ्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने धावणार आहेत.
कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉकचा फटका मेल-एक्स्प्रेसलाही बसेल. शनिवार आणि रविवारी मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान ११ वाजून ३४ मिनिटे ते दुपारी ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल, कुर्ला येथून विशेष लोकल सोडण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर तिकीट, पासवर पश्चिम रेल्वेने प्रवास करणे शक्य होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@