विनापरवानगी ताडपत्री लावणार्‍या हॉटेल मालकांना दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |



मुंबई: दरवर्षीप्रमाणे हॉटेलच्या आवारामध्ये विनापरवानगी ताडपत्री लावणार्‍या हॉटेल मालकांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. ’तुम्ही काही झोपडीधरक नाही, समाजातील उच्चभ्रू वस्तीत तुमचे रेस्टॉरंट आणि बार आहेत. त्यामुळे तुम्हाला विनापरवानगी ताडपत्रीचं छत उभारण्याचा अधिकार दिलाच कोणी?’ असा प्रश्‍न विचारत, उच्च न्यायालयाने खार-वांद्रे लिंक रोड परिसरातील बड्या हॉटेल मालकांना ताबडतोब ताडपत्रीचं छत काढण्याचे निर्देश दिले. या याचिकेत संबंधित हॉटेल मालकांच्या साथीने उच्च न्यायालयात दाद मागणार्‍या हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचीही कानउघाडणी करण्यात आली आहे.

विनापरवानगी ताडपत्रीचं छत उभारणार्‍या खार-वांद्रे परिसरातील हॉटेल मालकांना पालिकेनं हे छत हटवण्यासाठी नोटीस बजावली होती. या नोटीसला हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनसह ’ऑलिव्ह बार अ‍ॅड किचन’, 'मंकी बार’ आणि ’खार सोशल’ या वांद्रे लिंक रोडवरील बड्या हॉटेल मालकांनी उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. दरवर्षी आम्ही मान्सूनकाळात हे ताडपत्रीचं छत उभारतो, पालिकेकडून परवानगी ही नंतर मिळतेच. मुळात परवानगीसाठी अर्ज दाखल केल्यावर आधी छत उभारा, परवानगीचे मग पाहू, ही प्रथा पालिका अधिकार्‍यांनीच पाडल्याचे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात सांगितले. मात्र न्यायालयाने ताडपत्रीचे छत ताबडतोब हटविण्याचे निर्देश दिले.

@@AUTHORINFO_V1@@