गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांचा पाढा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |



गेल्या आठवड्यापासून पाणी व विजेअभावी रुग्ण बेहाल

टिटवाळा: गोवेली रुग्णालयात तालुक्याच्या अनेक गावांतील खेड्यापाड्यातील शहरी भागांतील गोरगरीब रुग्ण या रुग्णालयात येत असतात. सुमारे ६८ गावे उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. असे असतानाही गेल्या आठवड्याभरापासून या रुग्णालयात पिण्याचे पाणी आणि विजेअभावी रुग्णालयात येणार्‍या रुग्णांसह येथील कर्मचारीदेखील त्रासून गेल्याचे पाहायला मिळत आहे.

गोेवेली रुग्णालयात तालुक्यातील सुमारे ६८ गावे उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. ३ लाखांहून आधिक नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात गतवर्षी दररोज ३०० पेक्षा अधिक बाह्यकक्ष रुग्ण उपचारासाठी येत असत. आता ही संख्या १२० वर आली आहे. असे असताना या रुग्णालयात गेले आठवडाभर पिण्याचे व वापराचे पाणी तसेच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रुग्ण तसेच डॉक्टर, कर्मचारीवर्ग यांना त्रास सहन करावा लागत आहे. इथल्या समस्यांना कंटाळून नाईलाजास्तव या ठिकाणी येणार्‍या सर्वसामान्य रुग्णाला परवडत नसतानाही उपचारासाठी इतर खाजगी रुग्णालयांत जावे लागत आहे. सुविधेच्या नावाने नेहमीच बोंब असलेल्या या रुग्णालयाचा हा रामभरोसे कारभार कधी थांबणार? असा प्रश्न येथे येणारे नागरिक उपस्थित करत आहेत.

मागील एप्रिल महिन्यात आ. किसन कथोरे यांनी अचानक भेट दिल्यानंतर येथील ढिसाळ कारभार पाहून रुग्णालयाला टाळे लावा, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, रुग्णालयातील पाणी आणि विजेच्या समस्येविषयी गावेली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉ. कापूसकर यांना विचारले असता याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही या बाबींकडे लक्ष दिले जात नाही, असे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@