फेसबुक : माध्यम सं‘वादा’चे आणि व्यवसायाचे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |



 

 
 
 
 
जगातील अनेक नवनवीन माध्यमांबद्दल या पुढील लेखांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. गेल्या तीन दशकांमध्ये डिजिटल क्रांती झाली आणि माध्यमजगतावरती त्याचा सकारात्मक तसेच नकारात्मक परिणामही झाला. नवनवीन माध्यमेही उदयास आली. उत्पन्नाचे स्त्रोत बदलले आणि अशी अनेक माध्यमे जी आधी अस्तित्वात नव्हती, त्यांचा खूप मोठा परिणाम आणि प्रभाव संपूर्ण माध्यमांवरच नाही, तर संपूर्ण मानवजातीवर पडला, असं आपण म्हणू शकतो. यापैकीच एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे फेसबुक. फेसबुकने गेल्या १४ वर्षांमध्ये सुरुवातीपासूनच जी भरारी घेतली, ती डोळे दीपवणारी आहे. तेव्हा आज आपण फेसबुक काय आहे, त्यावर नेमक्या कशा प्रकारच्या वेगवेगळ्या सोयी उपलब्ध आहेत आणि त्याचे व्यावसायिक प्रतिमान काय आहे आणि त्यांच्या व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे, याबद्दल थोडं जाणून घेऊ.
 
 

फेसबुक ही एक सुप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट असून त्याची सुरुवात हार्वर्ड विद्यापीठामधल्या एका विद्यार्थ्यांच्या समूहाने केली. त्या समूहाचा प्रमुख मार्क झुकेरबर्ग होता. सुरुवातीला याचे नाव ‘द फेसबुकअसे होते. फक्त विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांना नेटर्किंगसाठी इंटरनेटचा वापर करणे इतकं याचं स्वरूप मर्यादित होतं. मात्र, काही महिन्यांमध्येच फेसबुकची लोकप्रियता संपूर्ण युरोपात आणि नंतर उत्तर अमेरिका आणि संपूर्ण जगभरात शिगेला पोहोचली. स्टॅनफोर्ड आणि बोस्टन या विद्यापीठामध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्यांना फेसबुकवर सदस्यता मिळवण्यास सुरुवात केली गेली, त्या वेळेपासून याची लोकप्रियता आणखी जास्त वाढली. २००९ पर्यंत फेसबुक ही जगात उपयोगात आणलेली एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीसोबत संपर्क करणारी वेबसाईट ठरली आणि नंतर फेसबुकने एका व्यवसायाचे स्वरूप अंगीकारून, भारतासारख्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या मोबाईल सेवा प्रदान करणार्‍या कंपन्यांसोबत भागीदारी किंवा करार केले आणि आता जगातील जवळपास ६० वेगवेगळ्या देशांमध्ये फेसबुकचे अधिकृत करार मोबाईल सेवा प्रदान करण्यार्‍या कंपन्यांसोबत आहेत. या करारांतर्गत फेसबुकचा उपयोग हा मोबाईलद्वारे मोफत केला जातो. तसेच फेसबुकवरती अनेक सोयीसुविधा नव्याने सुरुवात करण्यात आल्या आणि त्यानुसार खूप मोठं जाळं फेसबुकच्या माध्यमातून विणलं गेलं. फेसबुक पेज, फेसबुक कम्युनिटी, ग्रुप, इन्स्टाग्राम अशा वेगवेगळ्या सोयीसवलती फेसबुकने सुरू करून, अल्पावधीतच आपलं जाळं संपूर्ण जगामध्ये पसरवलं.

फेसबुकबद्दलची काही महत्त्वाची तथ्य

ज्यावेळी बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला, त्यावेळी फेसबुकच्या माध्यमातूनच त्यांची प्रसिद्धी झाल्यामुळे, त्यांच्या विजयाचे श्रेय फेसबुकलाही दिले गेले. फेसबुकमुळे व्यक्तीच्या खासगी आयुष्याला धोका निर्माण झाला आहे असं म्हटलं जातं. परंतु, फेसबुकमधून जोडलेले जवळपास २५ टक्के युजर्स फेसबुक प्रायव्हसी कंट्रोलला नाहीत. त्यांच्या दृष्टीने त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत असेल, तर त्यात त्यांना काहीच अडचण नाही. जवळपास प्रत्येक खंडात फेसबुकचे वेगवेगळे युजर्स पोहोचलेले आहेत. मात्र, त्यात युरोप, अमेरिका आणि आता आशिया या देशामध्ये सर्वात जास्त सर्वात जास्त फेसबुकचे वापरकर्ते दिसतात. आपला एकूणच संपर्क वाढवण्यासाठी फेसबुकने २०१२ मध्ये रशिया, दक्षिण कोरिया, जपान, भारत, ब्राझील इत्यादी ठिकाणांहून आपल्या वापरकर्त्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ केली आहे. फेसबुकवर दररोज ३ कोटी पेक्षा फोटो अपलोड केले जातात. फेसबुकचे साहजिकच वापरकर्ते फक्त पुरुष नाहीत, तर महिला देखील आहेत आणि एकूण वापरकर्त्यांमध्ये ५२ टक्के महिला आहेत, हे विशेष.

फेसबुकमार्फत अनेक वेगवेगळे गेम्स खेळले जातात. १८ मे २०१२ साली फेसबुकच्या शेअर्सची अमेरिकन निर्देशांकनॅश डॅगमध्ये नोंदणी झाली आणि त्या दिवसानंतर मार्क झुकेरबर्गचा जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये समावेश झाला. फेसबुकचे एकूण उत्पन्न सातत्याने वाढत आहे. फेसबुकच्या सक्रीय सदस्यांची संख्या सध्या दोनशे कोटींहून अधिक आहे आणि त्यांचे दरवर्षीचे उत्पन्न सोळाशे कोटी डॉलर इतके आहे. यामुळेच अनेक मोठ्या कंपन्या फेसबुकच्या मागे पडल्या आहेत. फेसबुकवर मोबाईलद्वारेसुद्धा जाहिराती मिळविता येतात आणि त्याद्वारेदेखील उत्पन्न मिळवितात. न्यूज फीड्समधून मिळणारे उत्पन्न, जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न आणि इन्स्टाग्राम फोटो शेअरिंगमधून उत्पन्न फेसबुकला मिळते.

फेसबुकद्वारे उत्पन्ननिर्मिती

आपण फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो, एकमेकांच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊ शकतो, मात्र आता फेसबुक ज्या वेगवेगळ्या सेवा देतं, त्या वेगवेगळ्या सेवांच्या माध्यमातून आपण त्या सेवांचे ग्राहक होतो. म्हणजेच आपण फेसबुकचे उपभोक्ते होतो. या उपभोगातून आपण फेसबुकचा सतत प्रचार करतो आणि फेसबुक या माहिती पुरविणार्या प्रचारकांची माहिती उत्पादकांना पुरवितो. फेसबुककडे आपल्या वापारकर्त्यांची संपूर्ण माहिती असते, ज्यावेळी आपण आपल्या फेसबुक प्रोफाईलवर आपल्या वयाबद्दल, शिक्षणाबद्दल, मित्रांबद्दल, आपण कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन करतो, आपले आवडते ठिकाण, आवडतं हॉटेल, मोबाईल नंबर, ईमेल या सगळ्या गोष्टींची माहिती फेसबुकवर दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून आपले प्रोफाईल फोटो, कमेंट्स, लाईक्स, वेगवेगळे शेअर केलेले आर्टिकल्स याद्वारे ही सर्व माहिती फेसबुकवर एकत्र येते आणि मग त्या माहितीचा उपयोग केला जातो आणि ती माहिती विकली जाते. एकूणच माहितीविक्री आताच्या काळातील हा खूप मोठा व्यवसाय आहे असं आपण म्हणू शकतो. फेसबुकच्या एकूण ज्या जाहिराती आहेत, त्या मिळवण्यासाठी किती लोक फेसबुकवर येतात याचा एक महत्त्वाचा संबंध आहे हे आपण ज्या वेळी बघायला जातो, त्या वेळी आपल्याला लक्षात येतो की, फेसबुकचे दोनशे कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. त्याचा आपोआप फायदा फेसबुकला होत असतो.

फेसबुक आणि वादविवाद

भारतामध्येच फेसबुकनेinternet.orgसर्वांसाठी इंटरनेट वापरण्याची मोहीम राबवली होती. मात्र, त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे फेसबुकलाच होत होता, हे नंतर सर्वांच्याच लक्षात आले. नुकतेच आता ‘केंब्रिज अॅनालिटिकाया कंपनीने फेसबुकवरचा डेटा चोरून, तो विकला. यावरून एकूण भारतामध्ये आणि जगामध्ये विवाद झाले आणि ती कंपनीसुद्धा बंद पडली. यासाठी फेसबुकला अमेरिकन सिनेटसमोर माफी मागावी लागली आणि अजून जवळ जवळ दोन हजार पानांचे आरोप फेसबुकवर दाखल केले आहेत आणि ते लवकरच सिद्ध होतील.

फेसबुकला घेऊन बरेचसे आरोप आहेत, मात्र त्यापैकी सर्व जगामध्ये प्रसिद्ध असलेली आणि सर्व युवकांना, महिलांना आकर्षित करणारी जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट आहे. स्वतः गुगलच्या संस्थापकांनी हे कबूल केलं होतं की, सोशल नेटवर्किंगची क्षमता ओळखण्यामध्ये त्यांच्याकडून चूक झाली आणि त्यांना या संदर्भात पावले उचलण्यात उशीर झाला. त्याआधीच फेसबुकने या बाजारपेठेवर आपला कब्जा जमवला होता, असं फेसबुकच्या सद्यस्थितीबाबत आणि व्यवसायासंदर्भात म्हणता येईल.

फेसबुकची काही महत्त्वाची तथ्ये आणि आकडेवारी

- फेसबुकचा आयपीओ १६ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा होता. (अमेरिकेतील तिसर्‍या क्रमांकाचा)

- फेसबुक जगातील चौथ्या क्रमांकाचा ब्रॅण्ड आहे आणि त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू ७० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

- फेसबुकने इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍपसारख्या स्पर्धकांना खरेदी करण्यासाठी २५ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले आहेत. फेसबुकच्या कर्मचार्‍यांची संख्या २५ हजारांपेक्षा जास्त आहे.

- मार्क झुकेरबर्गचे वेतन एक डॉलर प्रतिवर्ष आहे.

- फेसबुकच्या एकूण युजर्सची संख्या दोनशे कोटींहून अधिक आहे.

- त्यातही फेसबुकचे फक्त मोबाईल युजर्स १०० कोटींहून जास्त आहेत.

- ८३ टक्के पालक फेसबुकवर त्यांच्या मुलांच्या फ्रेंडलिस्टमध्ये आहेत.

- फेसबुकवर जवळपास ८ कोटी १० लाख बनावट अकाउंट्स आहेत.

- फेसबुकला सर्वाधिक लाईक्स त्याच्याच मेन पेजला २ कोटी ५ लाख युजर्सच्या रूपात मिळाले आहेत.

- मोबाईल वापरणार्‍या अमेरिकी नागरिकाचा इंटरनेटवरील २२ टक्के वेळ फेसबुकवर जातो.

- प्रत्येक मिनिटाला फेसबुकवर ४ कोटी लाईक्स केले जातात.

- फेसबुकवर ६ कोटी बिझनेस पेजेस आहेत. फेसबुकच्या उत्पन्नाच्या ७८ टक्के उत्पन्न मोबाईल जाहिरातीतून येते.

- एकूण ब्रॅण्ड्सच्या ७५ टक्के ब्रॅण्ड, पोस्टला प्रमोट करण्यासाठी मोबदला देतात

 
गजेंद्र देवडा

लेखक साठये महाविद्यालयात माध्यम विभागप्रमुख आहेत

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@