सुषमा स्वराज युरोपियन देशांच्या दौऱ्यावर रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |

फ्रान्स, इटली, लक्झेंबर्ग आणि बेल्जियमला देणार भेट



नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या आजपासून सात दिवसीय युरोप दौरासाठी रवाना झाल्या आहेत. स्वराज यांच्या या दौऱ्याचा कालावधी हा १७ ते २३ जूनपर्यंत असणार आहे. यामध्ये त्या फ्रान्स, इटली, लक्झेंबर्ग आणि बेल्जियम या देशांना भेटी देणार आहेत.

सर्वात प्रथम स्वराज या इटलीची राजधानी रोम येथे जाणार आहेत. इटलीचे नवनिर्वाचित पंतप्रधान ज्युसेप्पे कोन्टे यांच्या आमंत्रणावरूनच स्वराज यांचा हा दौरा आखण्यात आला असून या भेटीत कोन्टे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा त्या करणार आहेत. तसेच इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांची देखील त्या भेट घेणार असून भारत आणि इटली यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर त्या चर्चा करणार आहेत.

त्यानंतर १८-१९ तारखेदरम्यान स्वराज या फ्रान्सच्या दौरावर असणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या गेल्या वर्षीच्या भारत दौऱ्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांचा हा पहिलाच फ्रान्स दौरा असणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्या २० वर्षांच्या मैत्रीनिमित्त पॅरिसमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच फ्रेंच परराष्ट्र मंत्री आणि अन्य काही नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी त्याचर्चा करणार आहेत.


इटलीदौऱ्यानंतर दिनांक १९-२० ला स्वराज या लक्झेंबर्ग दौऱ्यावर जाणर आहेत, विशेष म्हणजे भारतीय परराष्ट्र मंत्र्यांचा लक्झेंबर्गचा हा पहिलाच अधिकृत दौरा असणार आहे. भारत आणि लक्झेंबर्ग यांच्या मैत्रीला यंदा ७० वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लक्झेंबर्ग पंतप्रधानाच्या आमंत्रणावरून त्यांचा हा दौरा होणार आहे. याठिकाणी भारतीय समुदायासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी त्या चर्चा करणार आहेत.

आपल्या युरोप दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात स्वराज या बेल्जियमच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी स्वराज या तीन दिवस थांबणार आहेत. याठिकाणी बेल्जियमच्या नेत्यांसह युरोपियन युनियनच्या अनेक प्रमुख नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची त्या भेट घेणार आहेत. तसेच भारत आणि युरोप यांच्या संबंधांविषयी चर्चा करणार आहेत. यानंतर त्या २३ तारखेला आपला मायदेशी येण्यासाठी रवाना होणार आहेत.


@@AUTHORINFO_V1@@