मुंबईत भाजप विजयाची शृंखला कायम राखणार:आमदार अ‍ॅड. आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |




मुंबई : "मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघ हे दोन्ही मतदार संघ पारंपारिक भाजपचे असून ते पुन्हा आपण मिळवू. गेल्या पाच वर्षात मुंबईंत ज्या-ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व भाजपाने जिंकल्या. आता शिक्षक आणि पदविधर मतदार संघात विजयाची ही शृंखला भाजप कायम राखेल,”असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अ‍ॅड. अमित महेता आणि मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. अनिल देशमुख यांच्या निवडणुक तयारीसाठी आज वसंत स्मृती, दादर येथे भाजपा पदाधिकार्‍यांचा मेळावा मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजप आमदार राज पुरोहित, मंगल प्रभात लोढा, सरदार तारासिंग, भाई गिरकर, अ‍ॅड. पराग अळवणी, अमित साटम, मनिषा चौधरी, आर. एन. सिंग यांच्यासह माजी आमदार, मुंबई पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष व कार्ययकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, "संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मतदारापर्यंत पोहोचून, त्यांच्याशी व्यक्तिगत संपर्क साधणे आवश्यक आहे. मुंबईत भाजपचे बूथपर्यंतचे संघटन आता मजबूत असून, या सर्व पदाधिकार्‍यांनी आजपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने काम केले आहे. त्याच पद्धतीने काम केले, तर भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी निवडणुक प्रक्रियेबाबत माहिती देतानाच दोन्ही उमेदवार हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. मुंबईकरांच्या, शिक्षकांच्या प्रश्नावर लढणारे दोन्ही कार्यकर्ते असून, त्यांना पक्षाने ही संधी दिली आहे. अ‍ॅड. अमित महेता यांनी मुंबईतील धार्मिक स्थळांवर हातोडा पडत असतना त्यांची बाजू न्यायालयात मांडली. मेट्रो बाधित रहिवाशांच्या हक्कासाठी ते लढत आहेत. त्यामुळे खर्‍या मुंबईकरांसाठी लढणारा कार्यकर्ता या निवडणुकीत उमेदवार पक्षाने दिला असल्याचे आ. शेलार म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@