दिल्लीतील कोणताही अधिकारी संपावर नाही : आयएएस असोसिएशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |

केजरीवाल यांचा खोटारडेपणा पुन्हा बाहेर





नवी दिल्ली :
दिल्लीतील सर्व आयएएस अधिकारी हे आपापल्या सेवेवर कार्यरत असून अधिकाऱ्यांच्या संपाविषयी केल्या जाणाऱ्या सर्व बतावण्या खोट्या असल्याची प्रतिक्रिया दिल्लीतील आयएएस असोसिएशननी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयएएस अधिकारी संपावर असल्याचे खोटी बातमी पसरवल्यानंतर आयएस अधिकाऱ्यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन या बातमीचे बिंग फोडले.

दिल्लीतील सर्व आयएएस अधिकारी हे आपली कामे करत असून कोणीही संपावर गेलेले नाहीत. सर्व अधिकारी हे आपली नेहमीची कामे आणि बैठका पार पाडत आहेत. सुट्टीच्या दिवशी देखील काही अधिकारी कामे करत आहेत. राज्यातील कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याला राजकारणाशी देणेघेणे नाही. परंतु काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून आयएएस अधिकाऱ्यांना त्यात ओढत आहेत,' अशी प्रतिक्रिया असोसिएशनच्या सभासद असलेल्या मनीषा सक्सेना यांनी दिली. तसेच असोसिएशनच्या आणखी एक सभासद वर्षा जोशी यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. 'आम्ही सर्व जण आमची कामे प्रामाणिकपणे पार पाडत आहोत, परंतु काही ठराविक लोकांमुळे आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी आज जनतेसमोर यावे लागत आहेत, त्यामुळे सध्या आम्हा सर्वाना आपण पिडीत असल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया जोशी यांनी यावेळी दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आयएएस अधिकारी संपावर गेले असून कोणीही काम करत नसल्याचा आरोप केला होता. तसेच अधिकाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा, म्हणून केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्ली राज्यपालांच्या निवासस्थानासमोर धरणेआंदोलन सुरु केले होते. केजरीवाल यांच्या या कृतीनंतर या सर्व अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडला आहे.
@@AUTHORINFO_V1@@