विजय मल्ल्याला आता पुन्हा एकदा परदेशात मोठा धक्का

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
ब्रिटन : ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने मद्यसम्राट विजय मल्ल्याला मोठा धक्का दिला आहे. भारतीय बँकांकडून विजय मल्ल्या याने घेतलेले जे कर्ज बुडवले यावर भारतीय सरकारने जी कारवाई केली या कारवाईला भारतीय सरकारचा जो पैसा लागला त्यातील कमीत कमी २००,००० पौंड एवढी रक्कम आता विजय मल्ल्या याने द्यावी असे आदेश ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने दिले आहे. 
 
 
 
विजय मल्ल्या याने बँकांचे कर्ज तर बुडविले आहे. मात्र यावर भारतीय सरकारने जी कारवाई केली त्याला देखील अमाप पैसा वाया गेला आहे. त्यामुळे विजय मल्ल्या याने आपल्या कर्जाची भरपाई तर करावीच मात्र पहिल्यांदा भारतीय सरकारला या कारवाईसाठी जो पैसा खर्च करावा लागला याची भरपाई आधी विजय मल्ल्या याने करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहे. 
 
 
 
 
आधीच सार्वजनिक बँकांचे नऊ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज विजय मल्ल्या याच्याकडे थकीत आहे. यासाठी मल्ल्याकडून ७०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी त्याच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात खरेदीदारांना बर्‍याच वस्तू उपलब्ध झाल्या असून, त्यामध्ये विमातळाजवळ असलेले किंगफिशर एअरलाईन्सचे मुख्यालय, अनेक कार, कार्यालयातील फर्निचर, बाथरोबसह अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले विजय मल्ल्यांचे खाजगी जेट, मल्ल्यांनी अनेक पार्ट्या आयोजित केलेले गोव्यातील किंगफिशर व्हिला आणि ‘फ्लाय वुईथ गुड टाईम्स’ या घोषवाक्यासह अनेक ब्रॅण्ड्स व ट्रेडमार्क्सचा समावेश आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@