राष्ट्रपती रामनाथ कोविंद ३ देशांच्या दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज ३ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दरम्यान ते ग्रीस, सूरीनाम आणि क्युबा या देशांना भेट देणार आहेत. नुकतेच राष्ट्रपती कोविंद यांनी स्वतः या बद्दलची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 
 
 
 
 
राष्ट्रपती म्हणून ही त्यांची चौथी राज्य भेटींपैकी एक असून आफ्रिकेबाहेरील पहिलीच भेट ठरत आहे. भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल यांच्या कार्यकाळानंतर कोविंद हे प्रथमच या देशांच्या दौऱ्यासाठी जाणार आहे.
 
 
यापूर्वी १० मे २०१८ रोजी कोविंद यांनी सियाचीन येथे जाऊन तेथील जवानांची भेट घेतली होती. ‘सियाचीन युद्ध स्मारकाला’ पुष्पांजली वाहिली. यावेळी रामनाथ कोविंद यांनी सियाचीन येथील जवानांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांना प्रोत्साहन दिले होते. सियाचीनला भेट देणारे रामनाथ कोविंद हे दुसरे राष्ट्रपती आहेत. तसेच २० मे २०१८ रोजीही राष्ट्रपतींनी चार दिवसीय हिमाचल दौऱ्यासाठी म्हणून सहपरिवार शिमला येथे भेट दिली होती. यावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ओनर' देखील देण्यात आला होता. 
 
@@AUTHORINFO_V1@@