चर्चेद्वारे प्रश्न निकाली काढण्याच्या, महापौरांच्या अधिकाऱ्यांना सूचना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |



मुंबई : “नायगाव येथील पुरंदरे मैदानाबाबत विविध प्रकारचे खेळ खेळणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचनांचे पत्र वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांना सादर करून, नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन, आपापसातील चर्चेद्वारे हा प्रश्न निकाली काढा,” अशी सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांंनी संबधित अधिकाऱ्यांना केली.

 

नायगाव येथील पुरंदरे मैदानात केईएमच्या विद्यार्थ्यांसाठी जिमखाना बांधण्यात येणार असून, या जिमखान्याला स्थानिकांचा असलेला विरोध लक्षात घेता, महाडेश्वर यांनी शुक्रवारी या मैदानाची पाहणी करून, स्थानिकांशी चर्चा केली. तसेच बांधण्यात येणाऱ्या जिमखानाच्या नियोजित आराखड्याची प्रत मैदानाच्या दर्शनी भागातील फलकावर लावण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली. याप्रसंगी स्थापत्य समिती अध्यक्षा अरुंधती दुधवडकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, उर्मिला पांचाळ, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पाचे प्रभारी संचालक विनोद चिठोरे, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) पराग मसुरकर, एफ/दक्षिण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त किशोर देसाई तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महाडेश्वर यांनी नागरिकांच्या समस्या सर्वप्रथम ऐकून, महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांसाठी जिमखाना बनविणे आवश्यक असून, सदर मैदानाचा दहा टक्के भागावर नियमाप्रमाणे बांधकाम करणे प्रस्तावित करण्यात आले असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@