केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांनी घेतली पद्मश्री कल्पना सरोज यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |



कल्याण : संपर्क फॉर समर्थन कार्यक्रमांतर्गत केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांनी नुकतीच कमानी ट्यूब्स लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षा पद्मश्री कल्पना सरोज यांची भेट घेतली. केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर संपर्क फॉर समर्थन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने ही भेट घेण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या दरम्यान कल्याण पश्चिमचे आ. नरेंद्र पवार यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांचे स्वागत केले.

 

या अभियानांतर्गत केंद्र सरकारने केलेल्या कार्याची माहिती पुस्तिका रूपाने समाजातील बुद्धिजीवी लोकांना देऊन, त्या कामांवर सविस्तर चर्चा केली जात आहे. राजकीय विरोधक विरोध करण्यात व्यस्त असताना भारतीय जनता पक्षाने अशाप्रकारचे सकारात्मक पाऊल उचलून, जास्तीत जास्त शिक्षण, आरोग्य, क्रीडा, प्रशासकीय, सामाजिक, संगीत, कलावंत, साहित्यिक, न्यायमूर्ती, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटून, सरकारचे कार्य आणि भूमिका मांडली जात आहे. भाजपबद्दल असलेले मत जाणून घेत, सकारात्मक बदल करण्याची शक्यताही आहे. कृष्णा राज यांनी आ. नरेंद्र पवार यांच्यासह मुंबई भेटीत पद्मश्री कल्पना सरोज यांची भेट घेऊन, सरकारच्या कामाचा तपशील आणि आगामी भूमिका यावर सविस्तर चर्चा केली. मागच्या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीनंतर आता कृष्णा राज यांचा दौरा संपन्न झाला.

 

ग्रामीण भागातून संघर्ष कल्पना सरोज यांचा कंपनीच्या अध्यक्षपदापर्यंतचा थक्क करायला लावणारा प्रवास, वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणींवर मात करत, त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. कल्पना सरोज ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत सध्या दहा कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतात. याआधी त्यांनी राष्ट्रीय युवा मंच, सुशिक्षित बेरोजगार मंडळ अशा सामाजिक संस्थांचे अध्यक्षपद भूषविले आहे. सामाजिक कार्याच्या चळवळीसाठी त्यांनी २१ हून अधिक देशांना भेट दिली आहे. त्यांच्या या प्रवासाचा विचार करत केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांनी भेट दिली आहे. विरोधक सरकारविरोधात ओरडत असताना त्यावर उत्तर न देता कामाच्या माध्यमातून उत्तर देण्याचे प्रयोजन भाजपने केले आहे. त्या अनुषंगाने देशभर संपर्क फॉर समर्थन ही मोहीम जोर धरत आहे.

@@AUTHORINFO_V1@@