कुणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |



शरद पवार यांची कोलांटउडी

 

पुणे : “पगडीबाबतच्या माझ्या वक्तव्यावरून अनेक मंडळी रागावली आहेत, पण कुणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोणत्याही एका वर्गाच्या विरोधात मला बोलायचं नव्हतं,” असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोलांटउडी मारली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात पवार यांनी छगन भुजबळ यांचा महात्मा फुले पगडी देऊन, सन्मान केला होता. तसेच, यापुढे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पुणेरी पगडीचा वापर करू नका, त्याऐवजी फुले पगडीने उपस्थितांचं स्वागत करा, असं पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. पवारांनी पुणेरी पगडीचा अपमान केला आहे. ते पुन्हा जातीयवादाकडं वळत आहेत, असा आरोप केला होता. पगडीबाबत पुणे महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

 

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे माझे आदर्श आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मी फुले पगडीचा आग्रह धरला. यातून कुणालाही दुखावण्याचा किंवा पुण्यावर टीका करायचा हेतू नव्हता. मी पुण्यात वाढलो आहे, याचा अभिमानच आहे,” असे पवार म्हणाले. “सातारा आणि कोल्हापूर येथे छत्रपती आहेत. छत्रपती हे एकच असतात. त्यामुळे त्यांची पगडी वापरता येत नाही. शाहू महाराजांची पगडी सामान्यांना सहज उपलब्ध होत नाही. डॉ. आंबेडकर यांनी परदेशी हॅट वापरली असली, तरी रोजच्या आयुष्यात ते टोपी वापरत नव्हते. त्यामुळे समतेचा आणि विज्ञानाचा पुरस्कार करणार्या महात्मा फुले यांचं पागोटं घालण्यात यावं, अशी माझी इच्छा होती. तेच मी बोलून दाखवलं,’ असेही ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@