बदलापूरच्या ट्रेकर आपटे यांचा उत्तराखंडमध्ये मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |

 

 
बदलापूर : ट्रेकिंगसाठी गेलेल्या बदलापूरच्या एका ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षद आपटे (३३) असे या ट्रेकरचे नाव असून, शुक्रवारी उत्तराखंडच्या बारा सुपा भागात ही घटना घडली.

 

हर्षद आपटे बदलापूरच्या पूर्व भागातील गांधी चौकात राहत होता. गुरुवार दि. ७ जून रोजी हर्षद त्याच्या ११ जणांच्या टीमसोबत उत्तराखंडला ट्रेकिंगसाठी गेला होता, यामध्ये बदलापुरचे चार जण तर इतर सात जण उर्वरित महाराष्ट्रातले होते. शिवाय दोन परदेशी ट्रेकर्सही या ट्रेकमध्ये त्यांच्यासोबत होते. दि. ९ जूनला या सगळ्यांनी ट्रेकिंगची सुरुवात केली. १५ जून रोजी ते ट्रेक संपवून बेस कॅम्पकडे परतत होते. मात्र, वाटेतला शेवटचा टप्पा असलेल्या बारा सुपा भागात आल्यावर ऑक्सिजनची कमतरता आणि श्वसनाचा त्रास यामुळे अत्यवस्थ झालेल्या हर्षदला तातडीने खाली आणण्यात आले, मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच हर्षदचे कुटुंबीय शुक्रवारी बदलापूरहून उत्तराखंडसाठी रवाना झाले असून, ते रविवारी उत्तराखंडला पोहोचणार आहेत. ३३ वर्षांचा हर्षद विवाहित असून, त्याला पाच वर्षांची मुलगीही आहे. त्याच्या अकस्मात निधनामुळे आपटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हर्षद हा पहिल्यांदाच हिमालयात ट्रेकिंगसाठी गेला होता. त्याला ट्रेकिंगचा छंद असल्याने महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले यापूर्वी सर केल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@