कमी गुण मिळालेल्यांसाठी संघाचा स्तुत्य उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



डोंबिवली : नुकताच १० वी व १२ वी शालांत माध्यमिक परिक्षांचा निकाल लागला. डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी यात घवघवीत यश संपादन केले. मात्र काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-जनकल्याण समितीतर्फे मार्गदर्शन शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

गुरुवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात निलेश काळे, जन कल्याण समिती कार्यवाह वासुदेव जांभळे , अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री तुषार निमकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विपीन मेनन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यार्थी व पालक मिळून ४५ जणांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. पूर्वेतील टिळक नगर शाळेत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय फाटक यांनी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची थोडक्यात माहिती प्रेझेंटेशनद्वारा सांगितली. तसेच तांत्रिक ज्ञानाला सध्या खूप महत्त्व आहे. याबाबत बोरीवलीमधील सुभाष कोळपते यांनी आयटीआयमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक टेक्निकल अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली. हे इतर कोर्सेस करून १२ वीचे प्रमाणपत्र मिळते. तसेच काही टेक्निकल कोर्स पूर्ण केल्यावर डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो, अशी माहिती दिली. अनेक विद्यार्थी ज्यांना कमी गुण मिळाले आहेत किंवा जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत, ते आयटीआय क्षेत्रात नवीन सुरुवात करू शकतात. या क्षेत्रातून स्वतःचे करिअर घडविलेल्या आणि आज स्वतः मोठ्या कंपनीचे मालक असलेल्या काहींची माहिती कोळपते यांनी विद्यार्थ्यांना दिली, परंतु मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही, याचीही आठवण करून दिली. आतिश कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांना समुपदेशन केले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण कसे ओळखावे, याबद्दल मार्गदर्शन केले. शिवाय विद्यार्थी आणि पालक यातील कमी होत असलेला संवाद, हे सर्व प्रश्नांचे मुख्य कारण असून भविष्य हे रिकामे आणि अर्थहीन आहे. त्यामुळे आलेल्या अपयशाचे ओझे घेऊन भविष्यात जाऊ नका, असाचा मोलाचा सल्ला दिला. ‘डू व्हॉट यू लव्ह, लव्ह व्हॉट यू डू,’ असा सल्ला देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

@@AUTHORINFO_V1@@