लालपरीच्या तिकीट दरात 18 टक्के भाडेवाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



तकिटांची आकारणीही पाचच्या पटीत होणार

मुंबई : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात येत्या १६ जूनच्या मध्यरात्रीपासून १८ टक्के भाडेवाढ करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने शुक्रवारी दिली. डिझेलचे वाढते दर, तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यापुढे सात रुपयांच्या तिकिटासाठी पाच रुपये आकारण्यात येणार आहेत, तर आठ रुपयांच्या तिकिटासाठी दहा रुपये आकारण्यात येणार आहेत.

 
 

इंधनाच्या दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी साधारण ४६० कोटी रुपये खर्च करावे लागत आहे. सध्या महामंडळाचे आर्थिक गणित बिघडल्यामुळे तिकीटदरामध्ये ३० टक्के इतकी वाढ करावी, असे महामंडळाने प्रस्तावित केले होते. परंतु, प्रवाशांवर जास्त आर्थिक भार पडू नये, यासाठी ही दरवाढ ३० टक्क्यांऐवजी फक्त १८ टक्के इतका करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@