रायझिंग काश्मीरच्या संपादकाची दहशतवाद्यांकडून हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |


श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' या वृत्तपत्राच्या संपादकाची काही दहशतवाद्यांनी गोळी घालून हत्या केली आहे. रमजान ईदच्या बरोबर एकदिवस अगोदर ही घटना घडली असून या घटनेमुळे श्रीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.


शुजात बुखारी असे या संपादकाचे नाव होते. राज्यातील प्रसिद्ध 'रायझिंग काश्मीर' वृत्तपत्राचे संपादक असल्यामुळे अनेक ठिकाणी ते परिचित होते. काल रात्री आपल्या कार्यालयातून ते बाहेर पडत असतानाच तीन अज्ञात हल्लेखोर मोटारसायकलवर बसून याठिकाणी आले व त्यांनी बुखारी यांच्यावर गोळीबार सुरु केला. थोड्या वेळात हे तिघेही गोळीबार करून पसार झाले. यानंतर बुखारी यांना रुग्णालयाकडे घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान पोलिसांनी या हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. या फुटेजमध्ये हे तिन्हीही हल्लेखोरांनी आपला चेहरा कपड्याने झाकले आहे. यामुळे त्यांची नेमकी ओळख पट नाही. परंतु पोलिसांनी मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी देखील या हत्येचा निषेध नोंदवत, 'राज्यातील दहशतवादाने अत्यंत खालची पातळी गाठली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच बुखारी यांच्या कुटुंबीयांसह आपण अशा संकटकाळी कायम उभे राहू, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@