होतकरू लेखकांसाठी कालनिर्णय लघु स्पर्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



एखादी कथा, कादंबरी लिहायची, तर लेखकाच्या प्रतिभेबरोबरच त्याच्या लेखन आणि वाचन कौशल्यांचीही कसोटी असते. पण जेव्हा तुम्हाला कमी शब्दांत आपली कथा वाचकांपर्यंत पोहोचवायची असते, तेव्हा हे कौशल्य अधिकच पणाला लागते. मोजक्या शब्दांत नेमका आशय वाचकांपर्यंत पोहोचवता येणे, ही लेखकाच्या लेखणीची ताकद आहे. तुमच्याकडे है कौशल्य असेल तर ‘कालनिर्णय’ आयोजित ‘काल्पनिक लघुकथा स्पर्धे’चे व्यासपीठ तुमच्यासाठीच आहे.

या नवीन वर्षात ‘कालनिर्णय’ने उदयोन्मुख लेखकांसाठी ‘काल्पनिक लघुकथा स्पर्धे’चे आयोजन केले आहे. त्यांच्यातील लेखनगुणांना वाव देण्यासाठी खास ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील कथा २५० शब्दांचीच असावी. २५० पेक्षा अधिक शब्दसंख्या असणाऱ्या कथा बाद ठरवण्यात येतील मात्र कथा कमीत कमी १५० शब्दांची असावी.

या स्पर्धेचे परीक्षक ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्रीकांत बोजेवार असतील. प्रथम पारितोषिक हे ५ हजार, द्वितीय पारितोषिक ३ हजार तर तृतीय पारितोषिक २ हजार इतके आहे. उत्तेजनार्थ १० पारितोषिके देण्यात येतील. विजयी स्पर्धकांच्या लघु लघुकथा कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रसिद्ध केल्या जातील. लेखकांनी आपल्या कथा कालनिर्णय, १७२, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, MMGS मार्ग, शारदा सिनेमा जवळ, दादर(पूर्व), मुंबई – ४०००१४. या पत्त्यावर पाठव्याव्यात.

[email protected] या इमेलवर देखील तुम्ही तुमच्या कथा पाठवू शकता.

कालनिर्णय वेबसाईटवरील www.kalnirnay.com/contest लिंकवर जाऊन तुमची कथा पाठविता येईल. परीक्षक व कालनिर्णय संपादन विभाग यांचा निर्णय अंतिम असून कथा पाठवण्याची अंतिम तारीख ३० जून २०१८ आहे.

स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी या https://kalnirnay.com/contest/ वेबसाईटवर भेट द्यावी

@@AUTHORINFO_V1@@