लोकशाही वाचविण्यासाठी तुरुंगावास भोगलेल्यांना पेन्शन देणे न्याय्यच : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



मुंबई: ``मिसाबंदीमध्ये लोकशाही वाचविण्यासाठी तुरुंगात गेलेल्या लोकांना पेन्शन देणे हा एक प्रकारचा न्याय्य आहे. तसेच या मिसाबंदींना स्वातंत्र्य सैनिक म्हटलेले नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे चुकीचे आहे,” असे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज स्प्ष्ट केले.

 
 

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिसाबंदींना पेन्शन देण्याच्या निर्णयावरून टीका केली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ”आणीबाणी विरुद्धच्या सत्याग्रहात एस.एम. जोशी, जयप्रकाश नारायण, भाई वैद्यांपासून पु.ल.देशपांडेंपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला होता. ही आणीबाणी योग्य होती का हे घोषित करावे. जर आणीबाणी योग्य नव्हती हे मान्य करणार असाल, तर त्यावेळी लढा दिलेल्या व १९ महिने तुरुंगात राहिलेल्या लोकांना मानधन देणे कसे चुकीचे आहे, हे त्यांनी सांगावे,” असे चंदक्रांतदादा पाटील म्हणाले. त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना मानधन देऊ नका हे कुठल्या न्यायात बसते, हे त्यांनी सांगावे. त्यावेळच्या लढ्यात स्वयंसेवकांनी आपली घरे उद्ध्वस्त करून सहभाग घेतला. त्यांचे नुकसान भरून न येणारे आहे. त्यामुळे त्यांना ही पेन्शन देणे न्याय्य असून, त्यांना केलेली ती छोटीसी मदत आहे.

@@AUTHORINFO_V1@@