'आयुष्मान भारत'साठी केंद्राचा वीस राज्यांबरोबर करार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |


नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'आयुष्मान भारत' या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेसाठी केंद्र सरकारने तब्बल २० राज्यांबरोबर करार केला आहे. या करारानुसार उपस्थित राज्यांनी आपल्या राज्यांमध्ये लवकरच ही योजना सुरु करण्याला मान्यता दिली. योजनेसंबंधीच्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आणि अटी मान्य करण्याचे आश्वासन केंद्र सरकारला देण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये देशातील वीस राज्यांचे आरोग्य मंत्री उपस्थित होते. यामध्ये नड्डा यांनी या सर्वांना 'आयुष्मान भारत' ही योजनेची माहिती दिली. तसेच हिच्या अटी आणि यामुळे सामान्य नागरिकांना होणारा फायदा याविषयी देखील माहिती दिली, व त्यानंतर या योजनेसंबंधी सर्व राज्यांबरोबर करार केला. तसेच या योजनेसंबंधीच्या सर्व बाबींची राज्यांनी लवकरात लवकर पूर्तता करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

'आयुष्मान भारत' ही मुळातच राज्यांची योजना आहे. कारण ही योजना गरीब नागरिकांसाठी असून प्रत्येक नागरिक हे राज्याच्या अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे आपल्या राज्यातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा पुरवणे हे प्रत्येक राज्याचे कर्तव्य आहे, असे नड्डा यांनी यावेळी म्हटले. तसेच राज्यांनी देखील याला सकारत्मक प्रतिसाद देत, योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आश्वासन दिले.

काय आहे 'आयुष्मान भारत' योजना ?


आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील जवळजवळ ४० टक्के नागरिकांना मोफत आरोग्य विमा सरकारकडून पुरवण्यात येणार आहे. या विम्याची कमाल मर्यादा ही ५ लाख रुपयांपर्यंत असणार असून प्रत्येक राज्य सरकारकडे आणि केंद्रकडे यातील लाभार्थ्यांची नोंद असणार आहे. यामुळे योजनेतील लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कधीही आणि कसल्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागल्यास ते कोणत्याही सरकारी अथवा खासगी रुग्णालयात जाऊन 'मोफत' उपचार घेऊन शकणार आहे. तसेच कोणत्याही दुसऱ्या राज्यातील व्यक्ती इतर कोणत्याही राज्यात जाऊन देखील उपचार घेऊ शकणार आहे. तसेच देशातील ४० टक्के लोकसंख्येला याचा लाभ होणार असल्यामुळे ही योजना जगातील सर्वात मोठी 'सरकारी विमा योजना' ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@