शिवसेनेला पुन्हा मराठीचे उमाळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



मूळ मराठी नावे बदलण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत

मुंबई: शिवसेनेने पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलला आहे. मुंबईतील अनेक भागांची मराठीतील नावे बदलून, इंग्रजीमध्ये नावे ठेवण्याचा घाट सध्या घातला जात आहे. या प्रकाराला शिवसेनेने विरोध केला असून पुन्हा मूळ नावे देण्यास दि. ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे परळ, लोअर परळ आणि प्रभादेवीसारख्या परिसरांना सध्या अप्पर वरळी यांसारख्या नावांनी संबोधण्याचे प्रकार सुरू आहेत. याला शिवसनेने विरोध केला आहे.

 
 

शिवसेनेची नुकतीच एक बैठक मुंबईमध्ये पार पडली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निरनिराळ्या भागांना इंग्रजी नावे देण्याच्या प्रकाराला विरोध केला. तसेच ही नावे बदलून, मूळ नावे लिहिण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली. दिलेल्या मुदतीत संबंधित पाट्यांवर मूळ नावे न लिहिल्यास सदर पाट्यांना काळे फासण्याचे आदेशही त्यांनी दिले. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील मराठी पाट्यांचा मुद्दा उचलत, दुकानांवरील पाट्या मराठीत करण्यास सांगितले होते. यासाठी ’खळ्ळ खट्याक’ पद्धतीचा अवलंब केल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकान आणि हॉटेल्सवरील पाट्या मराठीत केल्या होत्या. मात्र, आता पुन्हा निवडणुकांकडे पाहता शिवसेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा उचलण्यास सुरूवात केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@