सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकरोडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



 

नाशिक : नाशिकरोड येथे येत्या जुलै महिन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणार आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला एमबीएचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल व त्यासोबत स्थानिक पातळीवरील विषयदेखील सुरू करण्यात येतील.

 

गेल्या सात वर्षांपूर्वी नाशकात उपकेंद्र सुरू झाले होते. मात्र अल्पशी जागा, अपुरे मनुष्यबळ, मर्यादित अधिकार आणि साधनसामुग्रीची कमतरता यामुळे उपकेंद्राची अवस्था असून नसल्यासारखीच होती. त्यामुळे महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची फरफट सुरूच होती. याविषयीच्या आलेल्या तक्रारीची दखल घेत खा. हेमंत गोडसे यांनी नोव्हेंबर, २०१७ मध्ये कुलगुरू नितीन करमळकर यांची भेट घेतली असता त्यांना नाशिक येथे बंद अवस्थेत असलेल्या उपकेंद्राची माहिती दिली. उपकेंद्र प्रशस्त इमारतीत असावे, पुरेसे कर्मचारी असावेत, उपकेंद्रात विभागवार कक्षनिर्मिती करावी, पदव्युत्तर आणि पी.एच.डी. शिक्षकांना मान्यतेसाठी द्यावी लागणारी हार्डकॉपी उपकेंद्रात जमा करण्याची सुविधा असावी, इत्यादी सूचना यावेळी खा. गोडसे यांनी कुलगुरूंना केल्या होत्या. आपल्या मागण्या योग्य असून त्यावर लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही यावेळी करमळकर यांनी दिलीही होती. सुसज्ज कार्यालयासाठी वीस हजार चौरस फूट जागेची गरज असून जागेच्या पाहणीसाठी कुलगुरू स्वतः नाशिकमध्ये आले होते. या इमारतीतच पैठणी, फळबागा, द्राक्ष- कांदा आणि निर्यात या विषयांवर आधारित नव्याने चार अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे वक्तव्य त्यावेळी कुलगुरू करमळकर यांनीदेखील केले होते.

@@AUTHORINFO_V1@@