दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



नाशिक : दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील भाड्याने घर देणारे घरमालक यांनी अनोळखी इसमांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

घरमालक किंवा घराचे वहिवाटदार असलेल्या सर्व व्यक्तींनी मालकीची/ ताब्यातील घरे उदा. फ्लॅट, खोली, बंगला, शेड इत्यादी हे संबंधित भाडेकरू, पोटभाडेकरू किंवा भाडेपट्टी कराराने घेणार्‍या व्यक्तींविषयीची माहिती त्या कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनला विहीत नमुन्यात लेखी दिल्याशिवाय संबंधितांना घरे भाड्याने देऊ नये किंवा हस्तांतरित करू नये, असे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक रामदास खेडकर यांनी दिले आहेत. हा आदेश ६ ऑगस्ट, २०१८ पर्यंत अंमलात राहील. आदेशाचा भंग करणार्‍याविरुद्ध भारतीय दंड संहिता १६६० चे कलम १८८ प्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@