डिजीटल इंडिया समाजातील सर्व वर्गांसाठी आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली :  ज्यावेळी डिजीटल इंडियाची सुरुवात झाली होती, तेव्हा आमची मूळ उद्येश्य या समाजाला तंत्रज्ञानाशी जोडण्याचा होता. डिजीटल इंडिया समाजातील केवळ एका वर्गासाठी नाही तर सर्व स्तरातील लोकांसाठी खासकरुन ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे, असे प्रतिपादन पंत्परधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. आज नवी दिल्ली येथे डिजीटल इंडियासंदर्भातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 
 
 
डिजीटल इंडियामुळे रेल्वे तिकीटे, विविध बिल ऑनलाइन भरणे शक्य आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, या सुविधांचा लाभ ग्रामीण भारताने मोठ्या प्रमाणात घेतला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
 
डिजीटल इंडियामुळे ग्रामीण स्तरावरील उद्योजकांची निर्मीती झाली आहे :
 
डिजीटल इंडियाचे सगळ्यात मोठे यश म्हणजे यामुळे ग्रामीण स्तरावरील उद्योजकांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. डिजीटल इंडियाचा विविध गावांना मोठा फायदा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
यावेळी त्यांनी विविध ग्रामीण नागरिकांचे अनुभव सांगितले, उत्तरप्रदेश येथील जीतेंद्र सोलंकी यांचे अनुभव सांगत ते म्हणाले की, "डिजीटल इंडियामुळे उत्तरप्रदेश येथील गौतम बुद्ध गाव डिजीटल गाव झालं आहे. यामुळे तेथे १५ कंप्यूटर आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली आहे, जेणेकरून तेथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करणे शक्य आहे."
 
 
 
 
तसेच हरियाणा येथील मीनूचे अनुभव सांगत ते म्हणाले की, "हरियाणा येथील मीनू सांगतात, मी आता भीम अॅपचा वापर करायला शिकले आहे, यामुळे माझे जीवन सोपे झाले आहे, तेसच मला आता कुठलीही अडचण येत नाही." अशा प्रकारचे विविध अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
 
डिजिटल सशक्तीकरणासोबतच आम्ही तंत्रज्ञानाचा सृजनशीलतेला चालना देण्यासाठी देखील इच्छुक आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@