अनिवासी भारतीयांनी सात दिवसाच्या आत विवाह नोंदणी करणे अनिवार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : अनिवासी भारतीय अर्थात ‘एनआरआय’ यांनी लग्न झाल्यावर आपल्या विवाहाची नोंदणी सात दिवसाच्या आत करावी असे आदेश सरकारने दिले आहे. अनिवासी मुलगी अथवा मुलगा या दोघांनी लग्न झाल्यावर आपल्या विवाहाची नोंदणी भारतात करणे अनिवार्य असून नोंदणी केली नाही तर या दोघांचे पासपोर्ट रद्द करण्यात येईल असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 
 
 
 
 
 
काही दिवसांपूर्वी ‘रिजनल पासपोर्ट’ कार्यालयाकडून परत एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. नवीन लग्न झाल्यावर आपल्या पत्नीला भारतात सोडून पती परदेशात कामाच्या निमित्ताने जातात अशा पतींचे व्हिसा ‘रिजनल पासपोर्ट’ कार्यालय रद्द करणार आहे. त्यामुळे आता लग्न झाल्यावर पत्नीला देखील परदेशात न्यावे लागणार आहे. 
 
 
 
पंजाब, हरियाणा आणि चंडीगड या राज्यातील नुकतेच लग्न झालेल्या पतींचे व्हिजा रद्द करण्याची प्रक्रिया ‘रिजनल पासपोर्ट’ कार्यालयाकडून सुरु करण्यात आली आहे. लग्न झाल्यावर पती आपल्या पत्नीला सोडून परदेशात कामानिमित्त जातो मात्र तो कधी परत येतो याचा अंदाज पत्नीला नसल्याने आता पत्नी आपल्या पतीचा व्हिजा रद्द करू शकते. यासाठी सरकारने एक मदत क्रमांक दिला आहे यावरून पत्नी आपल्या पतीचे पासपोर्ट रद्द करू शकते. 
 
@@AUTHORINFO_V1@@