मनोहर पर्रीकर आजपासून कामावर रुजू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |

 
 
गोवा :  गेल्या अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजपासून पुन्हा एकदा कामावर रुजू झाले आहेत. गेले २ महिने ते अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत आता मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असून ते आज पासून पुन्हा एकदा कामावर रुजू झाले आहेत.
 
 
 
 
 
त्यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडियो शेअर करत जनतेचे आभार मानले आहेत. "तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळे आज मी पुन्हा एकदा कामावर रुजू होत आहे. अमेरिका येथे उपचार घेऊन मी आता पुन्हा काम करण्यास सज्ज झालो आहे. गोव्याच्या भविष्यासाठी आणि भल्यासाठी मी मनापासून काम करेन." अशा भावना त्यांनी या व्हिडियोच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
 
 
मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते, त्यासाठी ते गोले २ अडीच महिने अमेरिकेत उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना या स्वरूपात बघून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे.
 
 
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्या प्रकृतीतील सुधारणेबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. गोवा आणि महाराष्ट्राची जनता लवकरच त्यांना पु्न्हा जोमाने काम करत असताना बघण्यासाठी आतुर आहे, अशा भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केल्या होत्या, अखेर आज त्यांची ही इच्छा पूर्ण झाली असून पर्रीकर आजपासून कामावर रुजू झाले आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@