‘जनस्थान फेस्टिव्हल’19 जूनपासून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



नाशिक : येथील ‘जनस्थान’ या कलावंतांच्या ग्रुपच्यावतीने साजरा होणारा ग्रुपचा स्थापना दिन गेली तीन वर्षे ‘जनस्थान फेस्टिव्हल’ने संपन्न होत असतो. यंदाचे या सोहळ्याचे चौथे वर्ष असून चित्र-शिल्प प्रदर्शन, जनस्थान आयकॉन पुरस्कार, नृत्य आणि नाटक अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी यंदाच्या महोत्सवाची नाशकात ‘धूम’ होणार असल्याची माहिती अभय ओझरकर यांनी दिली.

 

राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर नाशिकची मान उंचावणार्‍या कलावंतांचा समूह अशी ‘जनस्थान’ची ओळख आहे. गेल्या तीन वर्षांत सामाजिक, सांस्कृतिक उत्सवांबरोबरच इतरही अनेक कामे ‘जनस्थान’तर्फे करण्यात आली. नवमाध्यमांना नावे ठेवणारा, त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहणार्‍या वर्गाला हेही सकारात्मक असते, मात्र त्याचा वापर तुम्ही कसा करता यावर त्या माध्यमाचे यशापयश अवलंबून असल्याचे ‘जनस्थान’ने आपल्या आजवरच्या वाटचालीतून दाखवून दिले आहे.

 

समुहाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ‘जनस्थान फेस्टिव्हल’ होत आहे. दि. १९ जूनला सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह पं. मकरंद हिंगणे यांच्या हस्ते चित्र-शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. त्यात नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या चित्र आणि छायाचित्रांसह धनंजय गोवर्धने, सी. एल. कुलकर्णी, राजेश-प्रफुल्ल सावंत, अनिल माळी, नंदन दीक्षित, श्रेयस गर्गे, प्रसाद पवार, यतीन पंडित, संदीप लोंढे, शीतल सोनवणे, स्नेहल एकबोटे, नंदू गवांदे आणि राजा पाटेकर यांच्याही कलाकृती असणार आहेत. १९ आणि २० जून असे दोन दिवस सकाळी १० ते रात्री १० या वेळात हे प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले असेल.

 

जनस्थान आयकॉन

 

‘जनस्थान आयकॉन’ सन्मान हा कार्यक्रम परशुराम साईखेडकर नाट्यगृहात दि. 21 जूनला सायंकाळी ६ वाजता मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होईल. कला-साहित्य क्षेत्रातील ग्रुपमधील महनीयांना ‘जनस्थान आयकॉन’ सन्मान देऊन या कार्यक्रमात गौरविण्यात येईल.

@@AUTHORINFO_V1@@