नवपित्यांच्या मागणीवर करा विचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018   
Total Views |



 

जगभरात कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या धोरणांमध्ये वेगाने बदल होत आहेत. याबाबत उदाहरण देताना युनिसेफ’ने भारताचा उल्लेख केला आहे. भारतात संसदेच्या पुढील सत्रात पितृत्व लाभ विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकामध्ये नवपित्यांना तीन महिन्यांची भरपगारी रजा दिली जाण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

 

आई झाल्यानंतर तिचे’ विश्व पूर्णतः बदलून जाते. नोकरी करणाऱ्या नवमातांना प्रसूतीपूर्व सुट्टी देण्याबाबतचा नियम लागू झाल्यामुळे नवजात बालकांचा संगोपनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे संगोपन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी जशी मातांची असते तशीच ती वडिलांचीदेखील असते, परंतु आपल्याकडे नवपित्यांच्या रजेसाठी कोणतीच नियमावली नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. मूल जन्माला आल्यानंतर पालकत्वाचा आनंद घेता यावा, याकरिता आता नवपित्यांसाठीही नवे नियम तयार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. युनिसेफ’च्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार नवपित्यांना काही दिवसांची भरपगारी सुट्टी देण्याबाबत कोणतेही राष्ट्रीय धोरण नसलेल्या ९० देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

 

या अहवालानुसार जगभरातील मुलांमध्ये जवळपास दोन तृतीयांश मुलांचे वय एक वर्षापेक्षा कमी आहे. हा आकडा नऊ कोटींच्या घरात आहे. या वयामध्ये मुलांना आईइतकीच वडिलांचीही गरज असते. मात्र ही मुले ज्या देशांमध्ये राहतात, त्या देशांत त्यांच्या वडिलांना एकही दिवस केवळ मुलासोबत वेळ घालवण्यासाठी भरपगारी सुट्टी दिली जात नाही. भारत आणि नायजेरियामध्ये नवजात बाळांची संख्या प्रचंड आहे. या दोन्ही देशांमध्ये नवपित्यांना भरपगारी सुट्टी देण्याबाबत कोणतेही राष्ट्रीय धोरण नसल्याने ९० देशांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

जगभरात कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या धोरणांमध्ये वेगाने बदल होत आहेत. याबाबत उदाहरण देताना युनिसेफ’ने भारताचा उल्लेख केला आहे. भारतात संसदेच्या पुढील सत्रात पितृत्व लाभ विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकामध्ये नवपित्यांना तीन महिन्यांची भरपगारी रजा दिली जाण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवपित्यांना आपल्या मुलाबरोबर काही काळ घालवता येणार आहे. याव्यतिरिक्त सुमारे ४० लाख अर्भके असलेल्या अमेरिकेसह आठ देशांमध्ये नवपित्यांना भरपगारी सुट्टी देण्याबाबत कोणतेही धोरण नसल्याचेही युनिसेफने म्हटले आहे. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीमध्ये वडिलांचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच वडिलांनी बरोबर असणे मुलांच्या जडणघडणीला हातभार लावते. त्यांच्या बुद्धीचा विकास वेगाने होण्यासाठीही वडिलांनी बरोबर असणे आवश्यक असते. त्यामुळे केवळ आईलाच नव्हे तर वडिलांनाही मुलांबरोबर राहण्यासाठी सुट्टी दिली जाणे आवश्यक आहे.

 

घरातल्या पूरक आणि पोषक वातावरणामुळे मुलांची जडणघडण होत असते. सुशिक्षित पालक सजगतेने मुलांना घडवतात. त्यामुळे मुले जास्त आत्मविश्वासपूर्ण आणि अनुभवसंपन्न होत असतात. यामध्ये वडिलांची भूमिका देखील महत्त्वाची असते. मुळातच स्वतःची स्वप्ने विसरून, आपल्या मुलांची स्वप्ने आपली मानून जगणाऱ्या वडिलांच्या भावभावनांचा जास्त विचार केला जात नाही. आपल्या मुलांसाठी धडपडणाऱ्या, निःस्वार्थीपणे प्रेम करणाऱ्या वडिलांच्या भावविश्वाचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळेच नवजात बालकांना वेळ देण्यासाठी आईप्रमाणेच वडिलांनादेखील पितृत्व रजा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पितृत्व लाभ विधेयक मंजूर झाल्यास तमाम पालकांना दिलासा मिळणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@