मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि परिसंस्थांचे होणार शैक्षणिक परीक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
समिती आणि कार्यबल गटाची स्थापना
 

मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६  नुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सुमारे ७७८ महाविद्यालये, परिसंस्था यांचे शैक्षणिक ऑडीट त्रयस्थ व्यवस्थेमार्फत करण्यात येणार असून यासाठी समित्या आणि कार्यबल गटाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय समितीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. तर सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास आणि गृह विभागाचे प्रधान सचिव या समितीमध्ये सदस्य असतील. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव या समितीत सदस्य सचिव असतील. याबरोबरच कार्यबल गट (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी या कार्यबल गटाचे अध्यक्ष तर उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने हे सदस्य सचिव असतील. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.आर.एस.माळी, वझे केळकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. गोविंद पारटकर आणि मुंबई विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव व्यंकटरमणी या कार्यबल गटाचे सदस्य असतील.
 
 
कार्यबल गटाला आवश्यक तेव्हा मार्गदर्शन करणे, त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे कृती आराखडा तयार करुन शासनामार्फत कुलपती यांना सादर करणे. कृती आराखड्याद्वारे ज्या संस्थांनी नियमांचे उल्लंघन केले आहे अशा संस्थांविरुध्द कार्यवाही/उपाययोजना करणे, प्रचलित यंत्रणा आणि कार्यपध्दतीमध्ये सुधारणा/उपाययोजना करणे, महाविद्यालये/संस्था यांच्याकडून संबंधित नियमांच्या उल्लंघनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विद्यापीठास मार्गदर्शक सूचना देणे अशा समितीच्या कार्यकक्षा ठरविण्यात आल्या आहेत. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@