गुळसुंदे ग्रामपंचायतीवर भाजप युतीचा झेंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



पनवेल : नुकताच झालेल्या पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन करत बाजी मारली. यामध्ये शेकापचा बालेकिल्ला राहिलेल्या गुळसुंदे ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या निवडणुकीत भाजप आघाडीचे हरिचंद्र बांडे यांनी भरघोस मतांनी थेट सरपंचपदी विजय मिळविला. यापूर्वी या ग्रामपंचायतीत भाजप आघाडीचा एकही सदस्य नव्हता. या ग्रामपंचायतीत भाजप शिवसेना युतीच्या नूतन रमाकांत पाटील, मारुती काशिनाथ माठळ, मनोज वसंत पवार, प्रभावती प्रभाकर कार्लेकर, पल्लवी नरेश ठाकूर सदस्य म्हणून विजयी झालेले आहेत. सरपंच म्हणून भाजपचे हरिश्चंद्र बांडे यांनी शुक्रवार, दि. १५ रोजी पदभार स्विकारला.

 

“गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत लाडिवली, आकुळवाडी व गुळसुंदे ही तीन गावे आणि वाड्या येतात. या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त विकासकामे झाली पाहिजेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन, त्या मार्गी लावण्याचे काम करणार आहोत. यासाठी नागरिकांचे मार्गदर्शन आणि सूचना विचारात घेऊन कामे करू,” असे सरपंच हरिश्चंद्र बांडे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@