दिल्लीला पुन्हा एकदा प्रदूषणाचा विळखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



नवी दिल्ली : दिल्ली शहराला आज पुन्हा एकदा प्रदूषणाचा विळखा पडला आहे. काल रात्रीपासून शहरातील वातारण हे झपाट्याने बदलले असून शहरातील हवा अत्यंत प्रदूषित झाले आहे. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत असून दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री ११ नंतर शहरातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. यामध्ये हवेतील एमपी-१० प्रमाण अत्यंत वाढले आहे. सामान्यपणे पीएम-१० चे प्रमाण १०० च्या आसपास असणे योग्य असते परंतु दिल्लीत मात्र अनेक ठिकाणी हा स्तर १५०० ते ४५०० पर्यंत जाऊन पोहोचला असल्यामुळे हा अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच येत्या तीन-चार दिवसांपर्यंत वातावरणातील हा बदल असा राहणायची शक्यता देखील मंडळाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्ला मंडळाने दिला आहे.

दरम्यान वातावरणातील या बदलाविषयीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अचानकपणे शहरातील वातावरण प्रदूषित कसे काय झाले, याचा शोध सध्या घेतला जात आहे. त्याचबरोबर शहरातील वातावरण आणखी प्रदूषित होऊ नये, म्हणून नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला देखील याविषयी काही सूचना देण्यात आल्या आहेत.



 
गेल्या दोन वर्षांपासून दिल्ली शहराला वारंवारपणे अशा प्रकारे प्रदूषणाचा विळखा पडत आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या अगोदर देखील दिल्लीला अशाचा प्रकारे प्रदूषणाने विळखा घातला होता. तसेच त्या अगोदर २०१६ मध्ये देखील शहरातील हवा अत्यंत प्रदूषित झाली होती. त्यामुळे हरित लवादासह सर्वोच्च न्यायालयाने देखील दिल्ली सरकारची कानउघडणी केली होती. परंतु तरी देखील त्यावर कसल्याही प्रकारची ठोस उपाय योजना करण्यात आली नव्हती.  
@@AUTHORINFO_V1@@