लाचखोर संजय घरत याला तीन दिवस पोलीस कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



डोंबिवली : अनधिकृत बांधकाम प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना बुधवारी अटक करण्यात आली. त्यांना व त्यांच्या अन्य दोन साथीदारांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कल्याण न्यायालयाने त्यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी दुपारी घरत यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर घरत यांच्या कार्यालयाची तसेच घराची व गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला पण मोबाईलचे पासवर्ड तसेच इतर माहिती देण्यास त्यांनी यावेळी नकार दिला. त्यामुळे सकाळी सुमारे ८ वाजेपर्यंत त्यांच्या कार्यालयात चौकशी सुरू होती व अखेर त्यांना बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तब्बल १७ तास चौकशी करण्यात आली.घराच्या झडतीत अनेक कागदपत्रे आणि महापालिकेतील महत्त्वाच्या फाईल्स सापडल्या असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

दरम्यानच्या काळात बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी आणखी एक आरोपी नारायण परुळेकर याला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली आहे.परुळेकर हा ठेकेदार असून त्यानेच पैसे देण्यास सांगितले होते. गुरुवारी त्यानंतर दुपारी ३ .३० वाजण्याच्या सुमारास चौघांना कल्याणच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे या आरोपींची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र घरत व दोन लिपिक अशा त्रिकूटाला तीन दिवस म्हणजे १७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले तर न्यायालयाने नारायण परुळेकर याला २८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

@@AUTHORINFO_V1@@