आता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 'पीएच.डी' अनिवार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवे नियम जाहीर, २०२१ पासून लागू 



नवी दिल्ली : विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेबरोबरच आता इच्छुक उमेदवाराकडे पीएच.डी असणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने या संदर्भातील नवे नियम नुकतेच जाहीर केले असून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याविषयी माहिती दिली आहे.

या नव्या नियमानुसार यापुढे विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी इच्छुक उमेदवाराला पात्रता परीक्षेबरोबरच स्वतः जवळ एक पीएच.डीने देखील बंधनकारक असणार आहे. तसेच कार्य मूल्यमापनासाठी श्रेणीपद्धत अवलंबण्यात येणार असून पदोन्नतीसाठी संशोधन हा आधार मानला जाणार आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. परंतु हा पदोन्नतीसाठीचा हा नियम फक्त विद्यापीठांमधील प्राध्यापकांनाच लागू करण्यात येणार असून महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी कसल्याही प्रकारची नवी बंधने नसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान आयोगाचे हे नवे नियम जुलै २०२१ पासून लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यामध्ये २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या प्राध्यापकांच्या नियुक्त्यांवर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. फक्त नव्या पदांच्या भरतीसाठी हे नवे निकष लावण्यात येणार आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच या नव्या नियमांमुळे देशातील शैक्षणिक दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@