पासपोर्ट कर्यालय पनवेलमध्येच हवे : आ. प्रशांत ठाकूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



पनवेल : पनवेल परिसरात झपाट्याने शहरीकरण होत असल्यामुळे लोकसंख्येत वाढ होत असून, खारघर, पनवेल, कळंबोली, कामोठे, उलवा नोड यांसारख्या विभागातून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही गरज लक्षात घेता पासपोर्ट कार्यालय पनवेलमध्ये झाले पाहिजे, यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी टपाल विभागाचे अधिक्षक अजेय सिंह यांची भेट घेतली.

 

यावेळी त्यांनी 'कार्यालय जागे अभावी पनवेलपासून दूर जाऊ नये या करिता पोस्ट विभागाने पनवेल परिसरात पर्यायी जागेचा शोध घेण्याची आवश्यकता असून, त्यासाठी पनवेल महापालिकेची मदत घ्यावी,' असे अधिकाऱ्यांना सुचविले व त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. पनवेलमध्ये मंजूर झालेले पासपोर्ट कार्यालय जागेअभावी इतरत्र सुरू करण्याचे वृत्त समजल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अजेय सिंह यांची भेट घेत या संदर्भात चर्चा केली.

 

नोकरी, व्यवसाय, शिक्षण, तसेच परदेशात फिरण्यासाठी पनवेल परिसरातील खारघर, कळंबोली, कामोठे, उलवा नोड तसेच तालुक्यातील विविध भागांतील लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेसाठी बरीच धावपळ करावी लागते. काही त्रुटी निघाल्यास पुन्हा ठाण्याला जाण्याची वेळ येते. नागरिकांना पासपोर्ट काढायचे असेल, तर ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालय गाठावे लागते, ही गरज लक्षात घेता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पनवेलमध्ये पासपोर्ट ऑफिसला मान्यता दिली. मात्र मुंबईच्या क्षेत्रीय टपाल कार्यालयाने पासपोर्ट कार्यालयासाठी पुरेशी जागा नसल्याचे कारण दिलेे. मात्र, पनवेल विभागात पासपोर्टची गर्दी पाहता या ठिकाणीच पासपोर्ट कार्यालय असणे ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आवश्यक जागेचा शोध टपाल विभागातील अधिकार्यांनी घ्यावा, अशी सूचना करून लवकरात लवकर पासपोर्ट कार्यालय निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.

@@AUTHORINFO_V1@@