भिलाई केवळ स्टीलचेच निर्माण करत नाही तर लोकांचे आयुष्य देखील घडवते : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |

 
 
नया रायपुर :  भिलाई येथे केवळ देशासाठी स्टीलचाच निर्माण करण्यात येत नाही तर भिलाईमुळे अनेकांचे आयुष्य घडले आहे, एक समाज घडला आहे, अशा भावना आज पंत्परधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. आज ते नया रायपुर येथे जनसभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी छत्तीसगढ येथे गेल्या काही वर्षात झालेल्या विकासाचे कौतुक केले.
 
 
 
 
आज छत्तीसगढ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांचे लोकार्पण केले. यामध्ये भिलाई स्टील प्लांटचा विस्तार, जगदलपुर येथे नवीन विमानतळ, भिलाई येथे आयआयटी कॅम्पस, भारत नेटफेज २ चा निर्माण या सर्व योजनांचा समावेश आहे, एकूण २२ कोटी रुपयाहून अधिक रकमेच्या सुविधा छत्तीसगढला देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 
 
छत्तीसगढ येथे आधी रस्ते नव्हते, मात्र आता रस्त्यांसोबतच विमानतळांचे देखील निर्माण होत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. "नया रायपुर" देशातील प्रथम "ग्रीनफील्ड स्मार्टसिटी" म्हणून तयार होत आहे. रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, रस्त्यांवरील दिवे आणि शहराची सुरक्षा दे सर्वच यामध्ये असणार आहे. देशाच्या इतर स्मार्टसिटीज साठी हे एक उत्तम उदाहरण ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले.
 

हिंसेला उत्तर केवळ विकासच असू शकते :

कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे उत्तर म्हणजे केवळ विकासच असू शकते. विकासाने उत्पन्न झालेला विश्वासच या हिंसेला समाप्त करतो, त्यामुळे जर कुठल्याही प्रकारची हिंसा संपवायची असेल तर त्यासाठी विकास अत्यावश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@