२१ रोजी चौथ्या जागतिक योग दिवसाचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
भंडारा :  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल समिती, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती , आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, किसान सेवा समिती, युवाभारत, जिल्हयातील विविध सामाजिक संघटना व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे २१  जून २०१८ रोजी भव्य जागतिक योग दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
 
 
जिल्हयातील सर्व नागरिक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, योगाप्रेमी यांनी जास्तीत जास्त संख्येनी योग दिन उत्सवामध्ये सहभागी व्हावे. कार्यक्रम शिबीर स्थळी येतांना प्रत्येकांनी योगा मॅट (चादर) सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@