राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या हिरक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



नाशिक : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने महिलांचे संघटन करत त्यांना शारीरिक, मानसिक, बौद्धीकदृष्ट्या सक्षम करण्यासोबत राष्ट्रप्रेम जागृत व्हावे यासाठी लक्ष्मी केळकर यांच्या पुढाकाराने व अखिल भारतीय राष्ट्र सेविका समितीच्या सहकार्याने नाशिक शहरात १९५८ साली राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीची स्थापना झाली. यंदा समितीचे हिरक महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दै. ’मुंबई तरुण भारत’ला देण्यात आली. यावेळी उपाध्यक्षा मंगला सौंदाणकर, डॉ.शुभांगी कुलकर्णी, चिटणीस विद्याताई चिपळूणकर, सहचिटणीस सुमित्रा गायधनी, खजिनदार सुलभा लिमये, सहखजिनदार भाग्यश्री पाटील आदि प्रमुख पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थापनेपासूनच सामाजिक गरजा ओळखून समितीतर्फे विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली. हिरक महोत्सवानिमित्त २१ जून रोजी जागतिक योग दिन कार्यक्रम होणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. असे विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. जुलैमध्ये महिला, मुलींसाठी स्व संरक्षण वर्ग होणार आहेत. तसेच अहिल्यादेवी वसतिगृह विस्तारीकरण काम सुरु असून ते हिरक महोत्सवी वर्षात पूर्ण करण्याचा मानस आहे. राष्ट्रसेविका समितीच्या वतीने नाशिकमध्ये महिलांसाठी पौरोहित्य वर्गही चालवले जातात. राणी भवनच्या वास्तूमध्ये १९८९ सालापासून स्त्री पुरोहितांचे वर्ग चालू आहेत. चार वर्ष कालावधी असणाऱ्या या वर्गामध्ये अथर्वशीर्ष, श्री सुक्त, पुरूषसुक्त, रूद्र, गंगालहरी, शिवमहिम्न आदी मंत्र शिकवले जातात.

 

या पौरोहित्य वर्गाला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गेल्या १९ वर्षांत हे वर्ग पूर्ण करणाऱ्या अनेक महिला सेविका आहेत. राष्ट्रसेविका समिती विविध उपक्रमाद्वारे राष्ट्र संवर्धनाचे कार्य करीत आहे.

@@AUTHORINFO_V1@@