रक्तदान शिबीराचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



डोंबिवली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डोंबिवलीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत डोंबिवली-कल्याण जिल्हा आणि वामनराव ओक रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

यंदा या शिबिराचे १५ वे वर्ष आहे. या शिबिराच्या निमित्ताने ३०० रक्तदाते जमविण्याचा आमचा मानस असल्याची माहिती विजयालक्ष्मी बोडस यांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन दि. १७ जून रोजी एमआयडीसी रिजन्सी परिसरात होणार आहे.तर दि. २४ जून रोजी सकाळी ९ .३० ते दुपारी २ वाजता पूर्वेतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर व पश्चिमेतील राणाप्रताप शाळेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात भरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी निलेश काळे 9820108049, यांना संपर्क साधण्यात यावा.

@@AUTHORINFO_V1@@