'परमाणु' चित्रपट महाराष्ट्रामध्ये करमुक्त करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



 

 
 
आमदार मंगल प्रभात लोढा लोढा यांची 
 

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरणचित्रपट राज्यात करमुक्त करण्याची अशी मागणी केली आहे. परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरणचित्रपटाचा विषय व संपूर्ण कथानक देशातील प्रत्येक नागरिकामध्ये सेनेबद्दल आदर जागवणारे आहे. त्यामुळे जर हा करमुक्त केला, तर जास्तीत जास्त प्रेक्षक हा चित्रपट बघू शकतील. तसेच यासंदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारांसोबतही चर्चा केली असल्याचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

 
 

‘परमाणु’ हा चित्रपट प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाबद्दल अभिमानाची जाणीव व गौरव वाढवणारा चित्रपट आहे व म्हणून त्याला करमुक्त करण्याची मागणी करणारे निवेदन आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आमदार लोढा म्हणाले की, विशेष म्हणजे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात ११ ते १३ मे १९९८ या दरम्यान पाकिस्तान सीमेवर राजस्थानातील पोखरण येथे केलेल्या अणुपरीक्षणाद्वारे देशाने पूर्ण जगामध्ये आपला दरारा निर्माण केला होता. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वामध्ये या परीक्षणाद्वारे भारताने सर्व जगासमोर हे सिद्ध केलं की, आत्म-सुरक्षेसाठी भारत मोठे निर्णयही घेऊ शकतो. या अणुपरीक्षणाच्या सत्य घटनेवर हा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट पहाणे गरजेचे आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@