अमेरिकेत उपचार घेऊन मनोहर पर्रीकर यांचे मायदेशी आगमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |

 
 
मुंबई :  गेल्या २ महिन्यांपासून अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेणाऱ्या गोवा येथील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मायदेशी आगमन झाले आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांचे मुंबई येथे आगमन झाले. लवकरच ते गोवा येथे परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोव्याच्या जनतेसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी भाजप आणि त्यांचे चाहते प्रार्थना करत असताना त्यांच्या परत येण्याच्या बातमीने सर्वांना आनंद झाला आहे.
 
मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते, त्यासाठी ते गोलो २ अडीच महिने अमेरिकेत उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच ते कामावर रुजू होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
 
 
 
 
दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्रीकर यांची अमेरिकेत भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीतील सुधारणेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. गोवा आणि महाराष्ट्राची जनता लवकरच त्यांना पु्न्हा जोमाने काम करत असताना बघण्यासाठी आतुर आहे, अशा भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@