पालिकेकडून नालेसफाई नाहीचखडेगोळवली नाल्यातील कचरा ‘जैसे-थे’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



कल्याण : कल्याण-डोंबिवली-महानगरपालिकेच्या कृपेने पावसाळा सुरू होऊनही शहरांतील अनेक ठिकाणी नालेसफाई न झाल्याने कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील नाल्यातील कचरा आणि गाळ मात्र जैसेे-थे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जूनच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाई पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, पालिकेच्या ढिसाळ आणि उदासीन कारभारामुळे अनेक ठिकाणी ही नालेसफाई अर्धवटच राहिल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नाल्यांतून काढलेला गाळ उचलून न नेता नाल्याच्याच बाजूला साठवून ठेवल्याने पाऊस पडल्यास पुन्हा हा गाळ नाल्यात वाहून जात आहे. खडेगोळवली येथे असलेल्या ‘आय’ प्रभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी जमा झाली असून, यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता आहे. मात्र, पालिका अधिकारी यांचे याकडे लक्षच नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी नालेसफाईच्या कामाचा पाहणी दौरा आयोजित केला होता. मात्र, पालिकेतील सफाई कर्मचार्‍यांचा नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. याबाबत विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ”सत्ताधार्‍यांचा प्रशासनावर अंकुश नाही. सत्ताधार्‍यांना मोठमोठे प्रकल्प घ्यायला हवेत. मात्र नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नालेसफाई रखडली असल्याचे सांगत येत्या दोन दिवसांत नालेसफाईच्या कामाची पाहणी करणार,” असे हळबे यांनी सांगितले. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी बबन बरफ यांना विचारले असता नालेसफाई सुरू असून या ठिकाणची येत्या दोन दिवसांत नालेसफाई पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले, तर संबंधित अधिकार्‍यांना या नाल्याची त्वरित सफाई करण्याचे आदेश देणार असल्याचे महापौर विनिता राणे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@