जम्मू काश्मीर येथे चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |

 
 
बांदिपुरा : जम्मू काश्मीर येथील बांदिपुरा येथे भारतीय सेना आणि दहशवाद्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात लष्कराला यश मिळाले आहे, तर या दरम्यान एक जवान शहीद देखील झाला आहे. दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते, याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.
 
आज पहाटे झालेल्या या चकमकीत लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्याची प्राणज्योत मालवली.
 
मंगळवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीसएफच्या २ आधिकाऱ्यांसह ४ जवान जखमी झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@